चक्क 6 वर्षाचा मुलगा झाला पायलट । जाणून घ्या हे अद्भुत | Lokmat Marathi News

2021-09-13 1

हातात खेळण्यातलं विमान घेऊन ते उडवणारी तुम्ही अनेक लहान मुलं पाहिली असतील. इतक्या अजाणत्या वयात हातात खेळण्यातलं विमान घेऊन ते घरभर फिरवायचं आणि ‘मला की नाही पायलट व्हायचं’ आहे असे सांगणारी अनेक मुलं आहेत. पण एका शाळेत जाणाऱ्या मुलाने वयाच्या सहाव्याचं वर्षी पायलट होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. ‘एतिहाद एअरवेज’न त्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आहे. अॅडम मोहम्मद आमीर असं त्याचं नाव असून कॉकपीटमध्ये सहवैमानिकाची जबाबदारी पार पाडतानाचा दिसत आहे. एवढ्याशा मुलाला विमानातली एकूण एक माहिती असल्याचे पाहून एतिहाद एअरवेजचे वैमानिकही आश्चर्यचकित झाले. अॅडम काही सामान्य मुलगा नाही, हे त्यांनी हेरलं आणि छोट्या अॅडमला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. त्याने व्हिडिओ पाहून, मासिकांमधली माहिती वाचून विमानाबद्दल सारी माहिती मिळवली होती. त्याचं विमानबद्दलचं कमालीचं ज्ञान पाहून एतिहाद एअरवेजनं त्यांला एकदवसीय सहवैमानिकाचं पद दिलं. वैमानिकाच्या सूचना ऐकून विमान चालवणाऱ्या अॅडमचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires